महिला दिनी रंगला वेगळाच वाद

Update: 2017-03-08 07:43 GMT

टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये रंगलेले वाद पाहतो. पण, महाराष्ट्र वन या वृत्त वाहिनीनं आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमानंतर फेसबुकवर एक वेगळाच वाद रंगलाय. निमित्त होतं सावित्र गौरव पुरस्कार वितरण समारंभाच. दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

या समारंभात शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे ज्या पहिल्या रांगेत बसल्या होत्या. पुरस्कार देण्यासाठी त्या व्यासपिठावर गेल्या त्यावेळी उशीरा आलेले काँग्रेस प्रवक्ते हुसैन दलवाई मनिषाताईंच्या जागेवर येऊन बसले. परिणामी व्यासपीठावरून खाली आल्यानंतर मनिषाताईंना पर्यायी जागा शोधावी लागली. महिला दिनाच्या कार्यक्रमात हा महिलांचा अपमान असे असं सांगत घडला प्रकार भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी फेबुकवर टाकला. तसंच काँग्रेस आणि हूसैन दलवाई यांच्यावर जोरदार टीका केली. दलवाई यांनी मनिषाताईंची माफी मागवी असं सुद्धा त्यांनी लिहीलं.

दलवाई यांच्यावर टीका करतांना वाघ यांनी 'हुसैनी प्रवृत्ती' हा शब्द वापरल्यानं आणखी वाद निर्माण धाला आहे

Full View

मनिषाताईंनी सुद्धा फेसबुकवरच मग घडल्या प्रकाराला दुजोरा दिला. पण, आपण दलवाईंच्या वयाचा मान राखल्याचं सांगितलं.

Full View

महिला दिनाच्या कार्यक्रमात तरी असं वागणं ठिक नाही. असं मी हुसैन दलवाई यांना गंमतीत सांगतिलं. पण, त्यांनी ते हसण्यावारी नेलं. - मनिषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेना

घडल्या प्रकारावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजून लोकांच्या प्रतिक्रीया येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत यांनी अवधूत वाघ यांना फेसबुकवर चांगलच सुनावलं आहे. तसंच भाजपचा सर्वेच्च नेता घरातच महिलेला स्थान नाकारत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय.

Full View

काँग्रेस प्रवक्ते हुसैन दलवाई यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकता नाही. पण, त्यांच्यावर टीका करतांना अवधूत वाघ यांनी 'हुसेनी प्रवृत्ती' असा शब्द वापरल्यानं आणखी वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी वाघ यांच्या फेसबुक पोस्टवर या शब्दाला आक्षेप घेतला आहे.

यातून भाजप आणि वाघ यांची मानसिकता लक्षात येते. जाणूनबुजून ते या सर्व प्रकाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत - अजित सावंत, सामाजिक कार्यकर्ते

 

 

Similar News