भाजपच्या पाशा पटेलांविरोधात गुन्हा दाखल

Update: 2017-09-17 07:49 GMT

पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांनी केलेल्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधात कलम 294, 504, 506 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. लातूरमधील विश्रामगृहात पत्रकाराने सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली का ? असा प्रश्न पाशा पटेल यांना विचारला असता त्यांनी पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ तर केलीच, त्या पत्रकाराच्या अंगावरही धावून गेले. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला. पत्रकार विष्णू भुरगे यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यानंतर पाशा पटेल यांच्यावर आज पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बसून संबंधित व्यक्तीने माझा अपमान केल्याचा दावा पाशा पटेल यांनी केला आहे. ‘कार्यकर्त्याप्रमाणे तो माझ्याबरोबर बोलत होता. मी विचारलं, तुझं वय आहे का माझ्या वयाच्या व्यक्तीशी असं बोलण्याचं? त्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीत माझा पारा चढला आणि मग त्या व्यक्तीने आपण पत्रकार असल्याचं सांगितलं.

Similar News