पहलाज निहलानी यांना उच्च न्यायालयाची नोटीस

Update: 2017-08-03 07:23 GMT

केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा मल्याळम चित्रपट 'बॉडीस्केप'च्या प्रदर्शित होण्याची अनिश्चिता ठेवल्यामुळे ही नोटीस बजावली आहे. न्यायालयात आरोप सिद्ध झाले तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. उच्च न्यायालयाने निहलानी यांना मे माहिन्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्णय लवकर देण्याचे आदेश दिले होते. परंतू वारंवार विचारणा करूनही निहलानी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ही नोटीस न्यायालयाने बजावली आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या चार सदस्यांनी हा चित्रपट वर्षातून चार वेळेस पाहीला. परंतू कोणत्याही प्रकारचा निर्णय दिला नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक जयन चेरीयन यांनी सांगितले की, चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावून चित्रपट प्रदर्शित करण्यास ९ सभासद तयार आहेत. परंतू अन्य सभासद तयार नाहीत. सेन्सॉर बोर्डाला माझा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा नाही. सेन्सॉर बोर्ड कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. हे खूप दुर्दैवी आणि गंभीर आहे. निहलानी यांनी याबाबत असे स्पष्टीकरण दिले की मी उत्तर देण्यास कोणाचाही बांधील नाही. चित्रपट किती वेळा पाहायचा तो माझा प्रश्न आहे.

Similar News