पटेल पटले ; तूपकर पेटले

Update: 2017-07-01 13:27 GMT

1 जूलै हा कृषीदिन साजरा करताना सरकारने राज्य कृषीमूल्य आयोगाला अध्यक्षही दिला आहे. असे असताना सत्तेतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तूपकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.

भाजपाचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्य कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारने नियुक्ती करून 1 जूलै हा कृषिदिन साजरा केला आहे. शेतक-यांच्या हिताचा निर्णय या माध्यमातून सरकार एकीकडे सांगत असले तरी सत्तेतील भागीदार असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हे मान्य नाही. हे सरकार शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हे सरकारधार्जिणे झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देवून सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे.

Similar News