पंरपरेच्या नावाखाली रक्ताची होळी

Update: 2017-03-14 10:30 GMT

सोलापूर जिल्ह्यातलं भोयरे गाव. जेव्हा राज्यभरात मोठ्या उत्सहात धुळवड साजरी केली जात होती तेव्हा या भोयरे गावात रक्ताची उधळण सुरू होती. परंपरेच्या नावाखाली अंद्धश्रद्धेची धुळवड इथं अनेकांना दर वर्षी रक्तबंबाळ करते.

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भोयरे नावाचं जवळपास चार हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात ग्रामदैवत आई भवानीला खूश करण्यासाठी दोन गटामध्ये दगडांची होळी खेळण्याची परंपरा आहे. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळीवडीला दिवसभर गावातील तरुण दगड, गोटे जमा करतात आणि संध्याकाळी दगडांच्या होळीला सुरवात होते. यात गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. ज्यात अनेक तरुण जखमी होतात. जेवढे लोक जास्त जखमी होतील, त्यावर्षी तेवढा पाऊस जास्त पडणार अशी अंधश्रद्धा असल्याने गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत, रक्तबंबाळ होईपर्यंत ही रक्ताची धुळवड खेळतात. बरं प्रकरण एवढ्वरच थांबत नाही तर, हे जखमी लोक दवाखान्यात डॉक्टरांकडे न जाता देवीच्या अंगाऱ्यावर बरे होतात.

अर्थात अशा प्रकारे धुळवड खेळून पाऊस पडला असता तर मराठवाडा आणि दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी आत्महत्या कiरण्यापेक्षा हेच केलं असतं. परंपरेच्या नावाखाली या गावात हा एक अघोरी प्रकार सुरू आहे.

Similar News