टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

Update: 2017-02-27 17:36 GMT

झी २४ तास ( रोखठोक )

भाजपशी यापुढं अजिबात युती करणार नाही, असा पुनरूच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात केलाय. सरकार 5 वर्ष टिकेल या भ्रमात कुणी राहू नये, असा इशारा देत राऊतांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेतही दिलेत. या निवडणुकीनेही बरंच काही शिकवलं असंही राऊतांनी यावेळी उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र वन ( आजचा सवाल )

महाराष्ट्र वनच्या आजचा सवाल या कार्यक्रमात कॉलेज कॅम्पसमधील सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय का? या प्रश्नावर सोमवारी चर्चा करण्यात आली. या चर्चेत अभाविप, एनएसयुआय आणि एसएफआयच्या प्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. अभाविपच्या प्रतिनिधींनी सरकार आम्हाला वाचवत नाही असं ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. एनएसयूआयचे मुंबई उपाध्यक्ष निखिल कांबळे, अभाविपचे मुंबई महानगर सेक्रेटरी रोहित चंदोडे आणि एसएफआयचे उपाध्यक्ष नासिर शेख हे विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले होते. राज्यशास्त्राचे प्राध्यापक श्रीरंजन आवटे यांनी यावेळी अभाविप या प्रकरणात कसं दोषी आहे याचा पाढा वाचला. तर नाशिक सकाळचे संपादक श्रीमंत माने यांनी सर्व विदयार्थी संघटनांचे यावेळी कान टोचले.

Similar News