खा. गायकवाड यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

Update: 2017-03-23 09:35 GMT

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना शिवसेना खासदार रवी गायकवाड यांनी पत्र लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी एअर इंडिया विमान सेवेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची, उच्च स्तरिय चौकशी करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. तसेच आज घडलेल्या घटनेची माहीती ही त्यांनी, लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली आहे.

काय आहे घटना ?

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. सकाळी 9 च्या विमानानं गायकवाड मुंबईहून नवी दिल्लीला चालले होते. त्यावेळी त्यांना इकनॉमी क्लासमध्ये जागा देण्यात आली. यावरून नाराज झालेल्या गयकवाड यांनी विमान नवी दिल्ली विनावतळावर पोहोचताच नाराजी व्यक्त केली तसंच आता मी उतरणारच नाही असा पवित्रा घेतला. यावरून नवी दिल्लीतील एका कर्मचाऱ्यानं त्यांना उतरण्यासाठी जबरदस्ती केली. तसचं काही अपमानजनक शब्द वापरले. त्यावर भडकलेल्या गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला 25 वेळा चप्पलनं मारहाण केली. मारहाण झालेला कर्मचारी एअर इंडियाचा कंत्राटी कामगार आहे.

नियमानुसार खासदारांनी विमान प्रवास करण्याआधी 3 ते 4 तास एअर इंडियाला कळवणे अपेक्षित असते. पण, गायकवाड यांनी उशीरा कळलं. परिणामी त्यांच्यासाठी बिझनेस क्लासमध्ये जागा आरक्षित ठेवता आली नाही असं एअर इंडियाकडूम सांगण्यात आलंय. या सर्व प्रकारानंतर एयर इंडियाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी समिती नेमण्यात आली असल्याचं कळतंय.

Similar News