केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मातृशोक  

Update: 2017-11-16 07:29 GMT

केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाबाई आठवले यांचं आज मुंबईत झालं. त्या ८८ वर्षाच्या होत्या. गेले काही दिवस त्या अल्पशा आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्याची उपचारा दरम्यान त्यांनी अखेरची श्वास घेतला. हौसाबाई आठवले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी रामदास आठवले यांच्या वांद्रे येथील ‘संविधान’ बंगल्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता त्यांच्यावर वांद्रेयेथील खेरवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

रामदास आठवलेंच्या वडिलांच्या निधना पश्चात हौसाबाई यांनी अत्यंत खडतर परिस्थित मोठे कष्ट उपसून रामदास आठवले यांचं पालन पोषण केले. शेतीवर मजुरी करून त्यांनी रामदास आठवले यांना शिक्षित केले. रामदास आठवले पहिल्यांदा मंत्री होऊन ही त्या शेतात मजुरी करत होत्या. गेल्या जुलै महिन्याातच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हौसाबाईंचा जाहीर सत्कार केला होता.

Similar News