असला ठरकी बाबा पाहिलाय का?

Update: 2017-05-12 09:59 GMT

बाबा स्वामी ओम. हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. गळ्यात सोन्याचा मोठा ओम, आठ-दहा रुद्रांक्षाच्या माळा, कपाळावर त्रिशूल काढलेला हा बाबा बिग बॉसच्या १० व्या सिझननंतर देशभरात प्रकाशझोतात आला. बिग बॉसच्या घरात त्यांन केलेला नागीन डान्स असेल किंवा सनी लियोनला जबरदस्ती मारलेली मिठी असेल. बाबा या ना त्या कारणानं चर्चेत राहीला. त्यानंतर एका हिंदी चॅनलच्या चर्चेमध्ये महिला पॅनलिस्टला या बाबानं लाईव्ह शोमध्ये कानशिलातही लगावली होती.

आता मात्र हा बाबा त्याचं आणखी ठरकी रुप घेऊन समोर आला आहे. या बाबाचा एका मुलीसोबतचा व्हीडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये बाबा एका मुलीला ब्रा घालायला सांगत आहेत. आणि हा ब्रा घातल्यावर मुली अधिक सुंदर दिसतात असं त्याचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ साधारण एका हॉटेलमधला दिसतोय. व्हिडीओच्या सुरुवातीला एक मणुष्य बाबांना रोलकॉल देतो आणि बाबा ब्रा घातल्यानं मुली किती आकर्षक आणि सुंदर दिसतील याचं मार्केटींग करतांना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओच्या सुरूवातीला ही तरूणी टॉपलेस दाखवण्यात आली आहे. एकीकडे हा बाबा स्वतःला देवाचा अवतार वगैरे म्हणवून घेतो आणि दुसरीकडे हे असे चाळे करतोय.

याच तरुणीबरोबर हा बाबा नग्न योगा करतांनाचा एक व्हिडीओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. आपण हे सर्व व्हिडीओ मर्जीनं शूट करत असल्यांच त्या व्हिडीओतल्या मुलीनं म्हटलंय.

https://youtu.be/WaXE1cV4d-8

Similar News