आमदार राम कदम यांच्या विधानाची महिला आयोगाकडून स्वाधिकारे दखल

Update: 2018-09-06 08:54 GMT

आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे (स्युमोटो) दखल घेतली असून आठ दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दहीहंडी उत्सवात बोलताना आमदार कदम यांनी महिलांविषयक काही विधाने केली होती. वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांमधून त्याचे वार्तांकन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कदम यांच्या या वक्तव्याची आयोगाने स्वतःहून दखल घेतली आणि आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

महिलांविषयक वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यापूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने कदम यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

Full View

Similar News