माहुलचे प्रदूषण माणसं संपवत आहे तरी सरकार गप्प का?

Update: 2019-12-21 10:53 GMT

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पायऱ्यांना धक्का लागून खाली पडलेत तर पायऱ्या तोडण्यात आल्यात. मात्र, माहुल गावामध्ये जीवन-मरणाच्या फेऱ्याच असणारे नरेंद्रसिंग यांच्याकडे मात्र, कुणाची नजर गेलेली नाही. पूर्ण शरीर त्वचा रोगाने ग्रासलेलं असून याचं कारण फक्त माहुल गावातलं प्रदूषण आहे. या अगोदर घरातले दोन व्यक्ती या परिवाराने गमावलेले आहेत. त्यांच्यावर आलेली वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून सरकारने माहुल गावातून लोकांना स्थंलातरीत करावं अशी मागणी नंरेद्रसिंग यांनी केली आहे.

माहुल वासीय नरेंद्र सिंग यांच्या घरातील दोन व्यक्ती हे माहुलच्या प्रदूषणामुळे मृत्यू पावले आहेत. खुद्द नरेंद्र सिंग हे देखील या प्रदूषणामुळे पीडित असून त्यांच्या संपूर्ण शरीराची त्वचा खराब झाली आहे. वडील आणि मुलीचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला आहे. स्वतः देखील अनेक व्याधी मधून अनेक वेदनांनी आपले जीवन जगत आहेत. घरामध्ये त्यांची पत्नी एकटीच कमावनारी आहे. दुसऱ्यांच्या घरी कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह हा परिवार करतोय.

Full View

उपचारासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी अनेक वेळा उपचार देखील थांबवला आहे. दुसऱ्याच्या कुंटूबावर आपल्यासारखी वेळ येउ नये म्हणून लवकरात लवकर सरकारने माहुल वासीयांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करावं, इथले वातावरण माणसांना राहणे योग्य नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणावर केमिकल कंपन्या आहेत. केमिकलचा धूर नाकातोंडात जाऊन श्वसनाचे त्याचबरोबर त्वचेचे आजार मोठ्या प्रमाणात होत असून लहान मुलांना याचा प्रंचड त्रास होतोय. मला झालेल्या आजारमुळे मला कामावरुन काढण्यात आलं. या सर्व परिसरामध्ये अनेक घरामध्ये डॉक्टरांच्या फाईल्स बाकावर असलेले रुण अशी परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे नाही तर एक – एक करुन या परिसरात अनेक लोकांना प्रदूषणामुळे आपला जीव गमवावा लागेल.

Similar News