भरपाई कोणाला...भाडेकरू की मालकाला?

Update: 2019-08-17 15:21 GMT

महाराष्ट्र सरकारने पूरबाधितांसाठी मदत जाहीर केली. मात्र या मदतकार्याचे वाद थांबण्याचे काही मार्ग दिसत नाहीत. सुरवातीला दोन दिवस घर पाण्यात राहण्याची अट, शहरी आणि ग्रामीण भागासाठी नुकसान भरपाईची वेगवेगळी रक्कम आणि आता जनतेसमोर नवा पेच आहे. भरपाई कोणाला...भाडेकरू की घरमालकाला?

शासनाकडून घर दुरुस्ती, घरबांधणी आणि पुरग्रस्तांसाठी दरमहा भाडे अशा स्वरूपात मदत जाहीर केल्यानंतर ही मदत मिळविण्यासाठी भाडेकरू आणि मालक यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मालक म्हणतायंत आमच्या घराचं नुकसान झालं तर भाडेकरू म्हणतायंत आमच्या वस्तूंचं नुकसान झालं. अशा परिस्थितीत काहींना घर सोडण्यासही सांगितलं जातंय. गावचे सरपंचही नेमकं कोणाला मदत मिळावी याविषयी आपलं स्पष्ट मत मांडू शकत नाहीत. वेळीच शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास हा वाद विकोपाला जाऊ शकतो.

अशाच काही सरकारी मदतीची आस लावून बसलेल्या नागरिकांची व्यथा 'मॅक्स महाराष्ट्र' ने जाणून घेतली पहा व्हिडिओ...

Full View

Similar News