टिळक की भाऊ रंगारी - गणेशोत्सव कुणी सुरू केला ? पाहा डॉ. श्रीपाल सबनीस काय म्हणाले...

Update: 2019-09-03 17:22 GMT

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? यावर नेहमीच वाद होत राहिलेले आहेत. मध्यंतरी पुणे महापालिकेनं आपल्या वेबसाइटवर काही काळासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊ रंगारी यांनी केली आहे. असं नमुद केलं होतं.

मात्र, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी या वादावर आपलं मत व्यक्त करताना भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेश उत्सवाचे संस्थापक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती पुण्यापुरता मर्यादित राहिला. तर लोकमान्य टिळकांचा गणपती उत्सव देशभर गेला. भाऊसाहेब रंगारी संस्थापक असले तरी प्रसारक लोकमान्य टिळक आहेत. या दोघांमध्ये कोणते वाद नव्हते.’

असं मत श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या छायाचित्र आणि चित्रग्रंथाचे अनावरण एस. एम. बिटा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस बोलत होते.

Full View

भाऊसाहेब रंगारी व लोकमान्य टिळक यांचे गणपती वेगळे असू शकत नाहीत. गणपतीला धर्म नसतो गणपतीचा धर्म जनकल्यांचा आहे. भाऊसाहेब रंगारी हे बहुजन, लोकमान्य टिळक ब्राम्हण अशा प्रकारे ब्राम्हण ब्राम्हनेतर वादाची बाधा या दोन राष्ट्रभक्ताच्या भक्तीला लावण्याचं पाप जातीवादी लोक करत आहेत. रंगारी ट्रस्ट लोकमान्य टिळकांच्या विरोधात नाही.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात क्रांती घडविण्याचे काम करण्यात झाले आहे. यामुळे संपूर्ण देश एकसंघ राहण्यास मदत झाली आहे. तर या गणेशोत्सवाचे संस्थापक भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळक यांनी याच उत्सवाचे प्रसारक म्हणून काम केले. यामुळे गणेशोत्सव जगभरात पोहोचण्यास मदत झाल्याचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता, उत्सव प्रमुख पुनीत बालन, तसंच शहरातील मानाच्या पाच ही आणि काही प्रमुख मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळक यांच्यावरून गणेशोत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणावरून वाद पाहण्यास मिळाला. तर या दोन महान व्यक्तिमत्वानी समाजात एकोपा राहावा यासाठी प्रयत्न केले. तर आपण त्यांच्यावरून वाद घालतो. अशा घटना होता कामा नये. हे समाजातील प्रत्येक घटकाने लक्षात ठेवावे. पण अशा घटनांना काही शक्तिनी खतपाणी घालण्याचे काम देखील केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भाऊसाहेब रंगारी हे बहुजन आणि लोकमान्य टिळक ब्राह्मण होते. असा जातीय रंग देण्याचे काम देखील समाजातील व्यक्तीनी केले. हे पाहून वाईट वाटल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Similar News