सर्वपक्षीय बैठक: सोनिया गांधी यांचे मोदी सरकारला रोखठोक सवाल

Update: 2020-06-19 19:25 GMT

लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांच्या प्रमुखांना बोलावण्यात आले होते. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिजू जनता दलाचे खासदार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतर पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी चीन ला धडा शिकवण्या संदर्भात मोदी सरकारला समर्थन दिलं.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. प्रारंभी लडाख येथे झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सरकारला रोखठोक प्रश्न विचारले. चिनी सैनिकांनी कोणत्या तारखेला लडाखमध्ये आपल्या सीमाभागात घुसखोरी केली? सरकारला घुसखोरी केल्याचं कधी समजलं? सरकारला 5 मे रोजी याची माहिती मिळाली की त्या आधी? सरकारला नियमितपणे आपल्या देशाच्या सीमाभागातील सॅटेलाइटद्वारे घेतलेली छायाचित्र मिळत नाही का? आपली गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे सरकाला वाटते का?

असे रोखठोक सवाल सरकारला केल्यानंतर राजनाथ सिंह यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यांनी कुठेही आपली गुप्तचर यंत्रणा अयशस्वी झाली नसल्याचा दावा या बैठकीत केला आहे.

यावेळी विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले. डेप्लॉयमेंट, कारवाई आणि प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी जे करायला हवं ते आपलं सैन्य करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

Full View

Similar News