द सोशल बार्बर

Update: 2019-07-17 06:18 GMT

अंगावर मळकटलेले कपडे, वर्षानुवर्षे आंघोळ नाही, वाढलेली दाढी, केसांना दाट जठा अश्या अवस्थेत असलेल्या निराधार लोकांचे दुःख समजून त्यांच्या अंधारलेल्या जीवन प्रकाशित करण्याच मोठं काम रवींद्र भिरारी हा अवलिया करत आहे.

मुंबई आणि उपनगरात असे असंख्य रेल्वे स्थानक आहेत जिथे भिकारी आपल्या वाढलेल्या दाढी आणि केसांमुळे अस्वस्थ असतात. मात्र, टिटवाळ्यातील अवलियाने त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि त्यांचे वाढलेले केस आणि दाढी करुन त्यांना सामाजिक पर्वात आणले. आपल्या दैनंदिन केशकर्तनाच्या व्यवसायातून थोडासा वेळ काढून रेल्वे स्थानकावरील भिकारी, अपंग, अंध व्यक्तींचे केस आणि वाढलेली दाढी मोफत करुन रवींद्र बिरारी यांनी समाजकार्यात नवा पायंडा पाडला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून रवींद्र बिरारी यांनी रेल्वे स्थानकावर असलेल्या निराधार, भिकारी आणि अपंग यांना स्वतःची ओळख मिळवून दिली आहे. याचसंदर्भात त्यांच्याशी केलेली खास बातचीत पाहा…

https://youtu.be/joy0ZTh92ek

 

 

 

 

 

 

Similar News