उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांसह दाभोलकर - पानसरे कुटुंबीयांना झापले

Update: 2018-09-06 12:59 GMT

आज उच्च न्यायालयात नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी उच्च न्यायालयाने एसआयटीला चांगलेच खडसावलं आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका. तसेच सीबीआयच्या अतीउत्साहीपणामुळे गुप्त माहिती प्रसिद्धी माध्यमासमोर येते. अशाप्रकारे माहिती बाहेर आल्याने इतर आरोपी सतर्क होतात, असं न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे. तसेच यावेळी न्यायालयाने पकडलेले आरोपी सुटले तर त्यांच्या आयुष्याचं किंवा त्यांच्या कुटुंबीयांचं काय? असा प्रश्न उपस्थित करत तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. तपास यंत्रणांचं लक्ष विचलित करण्याची ही चाल देखील असू शकते, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

 

 

 

Similar News