वंचित आघाडीची पहिली सभा फ्लॉप

Update: 2019-03-22 11:47 GMT

लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये सर्वात आधी उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची पहिलीच सभा फ्लॉप ठरलीय. पुर्वीच्या सभांना लाखांची गर्दी झाली होती. मात्र, जळगावच्या या सभेला एक हजारच्या आसपासही लोकं जमली नव्हती.

जळगाव आणि रावेर इथल्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर संयुक्त प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. मात्र, एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी गैरहजर होते.

प्रकाश आंबेडकर हे भाषण करत असतांना समोर फक्त एक हजारच्या आसपास लोकं उपस्थित असतील. त्यामुळं आधीच्या सभांनी गर्दीचे उच्चांक प्रस्थापित केले होते. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाल्यानंतर वंचित आघाडीची जळगावमधील पहिलीच प्रचारसभा फ्लॉप ठरली आहे.

रावेरमधून नितीन कांडेलकर तर जळगावमधून अंजली बाविस्कर या वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत.

Full ViewFull View

Similar News