दीड कोटीची लाच घेणाऱ्या राज्यमंत्री कांबळेंची हकालपट्टी करा – काँग्रेस

Update: 2019-03-28 12:19 GMT

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दारू दुकानाच्या परवान्यासाठी लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळं त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यानी केलीय. याप्रकरणी विलास चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. राज्यमंत्री कांबळे यांनी आपल्या हस्तकांकरवी शासकीय बंगल्यावरच दीड कोटींची लाच स्विकारली होती, तर उर्वरित रक्कम एका कंपनीच्या बँक खात्यावर ऑनलाईन (आरटीजीएस) हस्तांतरित करण्यात आली होती, असा आरोपही सावंत यांनी केलाय. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४२०, ४७१, १२० ब, ४२६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण व्यवहारात सव्वा दोन कोटींची लाच घेण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केलाय. त्यामुळं स्वतःला चौकीदार म्हणवणाऱ्या भाजपचे चौकीदारचं चोर निघत असल्याची टीका सावंत यांनी केलीय.

Full View

 

Similar News