Sri Lanka: कोलंबो आठ स्फोटांनी हादरलं, मृतांची संख्या 207 वर, एका भारतीय महिलेचा समावेश

Update: 2019-04-21 14:39 GMT

आज सकाळपासून श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 207 वर गेली आहे. तर 450 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत साखळी बाँबस्फोटांची संख्या आठवर पोहोचली आहे. मृतांमध्ये एका भारतीय महिलेचा समावेश असून ही महिला केरळमधील असल्याचं समजतंय. आत्तापर्यंत 9 परदेशी नागरिकांचा या बॉंम्बस्फोटात मृत्यू झाल्याचं एका खासगी वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

कोणत्या ठिकाणी झाले बॉम्बस्फोट?

कोलंबोमधील सेंट अंटोनी चर्च, शांग्री ला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल, नेगोम्बो चर्च आणि मट्टाकलाप्पू चर्च, देहिवाला प्राणीसंग्रहालय या ठिकाणी स्फोट झाले आहेत. या 8 बॉम्बस्फोटापैकी 6 बॉम्बस्फोट आत्मघाती होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्फोटामागे कोणाचा हात?

अद्यापपर्यंत या स्फोटाची कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्विकारली नसून श्रीलंकन पोलिसांनी आत्तापर्य़ंत 7 जणांना ताब्यात घेतलं असून या 7 जणांची कसून चौकशी सुरु आहे.

हा बॉम्बहल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भारतातील राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

भारतीयांसाठी परराष्ट्रमंत्रालयाने हेल्पलाईन सुरू केली आहे. भारत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. कोलंबोतल्या भारतीय दुतावासाकडून सर्व माहिती घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Similar News