शिवसेनेनं केला ‘राम’ गायब

Update: 2019-03-18 10:32 GMT

साधारणपणे पाच-सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेनं राम मंदिर निर्मितीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई टू अय़ोध्या असा दौराही केला. त्यानंतर पंढरपूरचाही दौरा केला. मात्र, मंदिराचा प्रश्न काही पुढे सरकेना. मग पहले मंदिर फिर सरकार, अशी घोषणा देण्यात आली. भाजपसोबत युती झाल्यानंतर मात्र शिवसेनेकडून राम मंदिराचा मुद्दाच गायब करण्यात आल्याचं दिसतंय.

पहले मंदिर, फिर सरकार

२३ ऑक्टोबर २०१८ मध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेनं गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर भगवान रामाची मोठी मूर्ती एका बाजूला ठेवण्यात आली होती. याच व्यासपीठावरून पुन्हा पहले मंदिर, फिर सरकार असा नारा देण्यात आला होता. तर आधी मंदिर मग युती असंही उद्धव यांनी भाजपला सुनावलं होतं.

[button data-color="" data-size="" type="square" target="" link=""]२३ ऑक्टोबर २०१८ [/button]

शिवसेनेनं केला राम गायब

१९ फेब्रुवारी २०१९ रोजी शिवसेना-भाजपची युती झाली. त्यानंतर १७ मार्च २०१९ रोजी औरंगाबादमध्येच शिवसेना-भाजप युतीचा मराठवाडा विभागीय मेळावा संपन्न झाला. युतीच्या या मेळाव्यात मात्र व्यासपीठावर ‘राम’ दिसलाच नाही, शिवाय भाषणातूनही ‘राम’ फारसा ऐकायला मिळाला नाही. पाच-सहा महिन्यांपूर्वी ‘राम मंदिर’प्रश्नावर आक्रमकता दाखवणारी शिवसेना काहीशी मवाळ झाल्याचं मेळाव्यात दिसत होतं. युतीच्या या मेळाव्यात कुणीही भगवान रामाचा साधा उल्लेखही केला नाही. पाच महिन्यांपूर्वी मंदिर प्रश्नावर या औरंगाबादमध्ये आक्रमक झालेल्या शिवसेनेला युतीच्या मेळाव्यात मात्र भगवान रामाची आठवण कशी झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

[button data-color="" data-size="" type="square" target="" link=""]१७ मार्च २०१९ [/button]

 

Similar News