पार्थने केला पवारांचा पत्ता कट !

Update: 2019-03-11 10:35 GMT

"मी माढ्यातून निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह आहे. मात्र, पक्षाने अद्याप माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. एकाच कुटुंबातील किती लोकांनी निवडणूक लढवावी? त्यामुळे कौटुंबिक पातळीवर माघार घेण्याचा निर्णय घेतला,"

असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आज माघार घेत असल्याचे सांगितले. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

मावळमधून पार्थ पवार...

सुरुवातीला पार्थ पवार यांच्या नावावर सहमत नसलेल्या शरद पवारांनी आज पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार असल्याचं सांगितले. यासाठी पवारांनी खास आपल्या शैलीत यासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मागणी होत असल्याचे कारण दिले असले तरी पार्थच्या उमेदवारीसाठी स्वत: अजित पवार पहिल्यापासून आग्रही असल्याचं समोर आलं आहे.

माढ्यातून विजय सिंह मोहिते-पाटील

माढ्यातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर विजय सिंह मोहिते पाटील यांचे नाव जवळ जवळ फायनल झाल्याचे मानलं जात आहे.

दोन पवार लोकसभेवर?

सुप्रिया सुळे बारामतीमधून लढणार आहे, पार्थ पवार यांनी लोकसभा लढवावी अशी मागणी होत आहे त्यामुळे एकाच घरातील तिघांनी निवडणूक लढवणं योग्य ठरणार नाही.

Similar News