सामाजिक बहिष्कारावर साने गुरुजींचे विचार...

Update: 2018-12-24 13:52 GMT

जगाला खऱ्या प्रेमाची आणि खऱ्या धर्माची शिकवण देणाऱ्या साने गुरुजींची आज १२० जयंती. स्वातंत्र्यसेनानी, गिरणी कामगार नेते, शेतकर्‍यांच्या संघर्षाचे प्रणेते, अस्पृश्यता विरोधी लढ्यातील सेनानी, प्रसंगी गाधींजींचा आदेश अव्हेरुन उपोषण करीत पंढरपूर मंदिरातील बडव्यांना वठणीवर आणणारे, लेखक, पत्रकार, इतिहासकार, तत्वचिंतक... असे साने गुरुजींचे विविध पैलू…

मात्र, साने गुरुजींना जगाला खऱ्या धर्माची शिकवण देताना खरा लढा जवळच्या लोकांशी करावा लागला. असंविषमता आणि धर्मवादाच्या विरोधात लढताना ब्राह्मण समाजाने त्यांच्या घरावर बहिष्कार टाकला. याविषयी आपल्या बंधुना गुरूजींनी पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात - भाऊ, ब्राह्मण मंडळी न आली तर बाकीचा समाज येतो ना? पाच दूर राहिले तर पाचशे जवळ आले, जनता जनार्दन जवळ आला... ब्राह्मणांचे डोळे कधी उघडतील ते खरे. या अनुदारामुळेच कोट्यवधी परधर्मात गेले, त्यातुन पाकिस्तान जन्मले... ही पापे फळत आहेत...

ही आहे गुरुजींनी लिहिलेलं ते पत्र...

Similar News