केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे - रणदीप सुरजेवाला

Update: 2018-09-07 05:46 GMT

सध्या सुरु असलेल्या पेट्रोल दरवाढीची आग पेटतच चालली आहे. दिवसेंदिवस ही दरवाढ वेगाने वाढत जाऊन यामध्ये सामान्य जनतेची मात्र चांगलीच लुट सुरु आहे. ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत फक्त ऑगस्टपासून झालेल्या दरवाढीचा विचार केला असता जवळजवळ अडीच रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ जर अशीच वाढत राहिली तर दहा ते पंधरा दिवसात पेट्रोल ९० रुपये प्रतिलीटर तर डिझेल ८० रुपये प्रतिलीटर होऊ शकते. यासगळ्यासंदर्भात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल, डिझेल दरवाढ होत असल्याचे कारण सरकार देत आहे.

सोमवारी या दरवाढीविरोधात देशव्यापी बंद पुकारण्यात येणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. याबाबत काँग्रेसनेते अशोक गेहलोत आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्याविरूद्ध पुकारलेल्या बंदमध्ये विरोधी पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, तसेच जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी हा बंद आहे. नागरिकांची कोंडी होऊ नये यासाठी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद पाळला जाईल असे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरवर भरमसाठ कर लावून मोदी सरकारने साडेचार वर्षात 11 लाख कोटी रुपये कमावले. जनतेची लूट करून हा पैसा कोणाच्या खिशात गेला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Similar News