काश्मिरमध्ये गावे ओस पडली 

Update: 2018-01-21 10:26 GMT

काश्मिरच्या सीमारेषेवरच्या भागातली गावे रिकामी करण्यात आली आहे. इथल्या जवळपास तीन हजार गावकऱ्यांचे स्थलांतरीत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरच्या खोऱ्यात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार होत आहे. याचा थेट परिणाम तिथल्या लोकांवर होत आहे. आधी फक्त रात्री होणारा गोळीबार आता दिवसाही होऊ लागला आहे. यात आतापर्यंत चार नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतीय सैनिक या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असले तरीही पाकिस्तानकडून सतत होणारा हा गोळीबार पाहता गावकऱ्यांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

पुंछ पासून आरएस पुरा क्षेत्रातल्या गावातल्या गावकऱ्यांना सुरक्षित बंकरमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. इथल्या शाळा पुढच्या तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे या भागांमध्ये अघोषित संचारबंदीच लागू झाली आहे.

लष्कराने सीमावर्ती भागाचा ताबा घेतला आहे. ज्या भागातून जास्त गोळीबाराच्या घटना होत आहेत. त्याभागात प्रत्युत्तर देण्यासाठी अतिरिक्त तुकड्या ठेवण्यात आल्या आहेत.

तर पाकिस्तानात घुसून कारवाई करु - गृहमंत्री राजनाथ सिंह

पाकिस्तानाकडून गोळीबाराच्या घटना वाढल्याने तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे आता जर हे थांबलं नाही तर आम्ही पाकिस्तानात घुसून कारवाई करु. अशा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. ते लखनऊ इथे एका कार्यक्रमात बोलत होते. आम्ही स्व:ता लढाई सुरु करणाऱ्यातले नाही. म्हणून आम्हाला कुणी मजबूर, हतबळ, समजू नये, असेही राजनाथ सिंह म्हणाले

Similar News