बांधकाम व्यवसायाला पुर्वपदावर येण्यासाठी ९ ते १२ महिने लागतील: क्रेडाई, एमसीएचआयचा अहवाल

Update: 2020-05-28 14:03 GMT

क्रेडाई-एमसीआय या संस्थेने एक सर्व्हे केला असून या सर्व्हेच्या आधारावार त्यांनी एक अहवाल प्रकाशीत केला आहे. लॉकडाऊन मुळं सर्वच क्षेत्रामध्ये मंदी आली आहे. या संदर्भात प्रश्नावलीच्या माध्यमातून ५०० सदस्यांच्या माहितीच्या आधारानं हा अहवाल प्रकाशित केला आहे.

काय आहे हा अहवाल...

या संशोधन अहवालानुसार ६० टक्के विकासकांचं असं म्हणणं आहे की, लॉकडाऊननंतर 9 ते 12 महिन्यांत रिअल इस्टेटचा व्यवसाय सामान्य होताना दिसेल. तर केवळ ३० टक्के विकासकांच्या मते 6 महिन्यांत व्यवसाय सामान्य होईल.

क्रेडाई-एमसीआयआयने त्यांच्या सदस्यांनी या सर्व्हेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. नोटाबंदी, रेरा, जीएसटी अशा अनेक संकटांना रिअल इस्टेट तोंड देत असतांना अलिकडे जगभरात पसरलेल्या रोगराई डोके वर काढल्यानं व्यवसायांबरोबरच व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.

इतकी वाईट परिस्थिती असताना देखील ८३ टक्के व्यावसायिकांना हा व्यवसाय योग्य वाटतो. त्यामुळं त्यांना हा व्यवसाय बदलायची इच्छा नाही.असं ते या अहवालात स्पष्ट करतात.

क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शाह या अहवालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले,

“रिअल इस्टेट उद्योग भारतातील इतर उद्योगांप्रमाणेच स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहे, त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल मानला पाहिजे. या सर्वेक्षणानुसार सध्याच्या कठीण परिस्थितीतही 83 टक्के विकासकांनी आपल्या उद्योगाशी दृढता आणि आत्मविश्वास दाखवून याच व्यवसायात कायम राहत पुढे जाणे पसंत केले आहे. तर योग्य किंमत मिळाल्यास, जवळजवळ 50% विकसकांनी नवीन मालमत्ता संपादित करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच २०२१ सालापर्यंत निवासी क्षेत्रात प्रकल्प सुरू करण्याची इच्छाही दर्शवली आहे. भविष्यातील प्रकल्पांमध्ये WHF विचारात घेऊन डिझाइनमध्ये बदल घडवणे बंधनकारक असेल, पण काही विकासक सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांतून प्रयत्न करण्यासाठी उत्सुक आहेत.”

साइटवरील कामगार आणि कुशल कारागिरांची कमतरता असूनही बरेच विकासक आपला प्रकल्प कसा पूर्ण होईल? याकडे लक्ष केंद्रित करतांना दिसत आहेत. या सर्व्हेमध्ये विशेष गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे ९५ टक्के विकासक Essential commodities sector किंवा करमणूक सारख्या क्षेत्रामध्येही आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसंच काही लोकांनी वस्तू क्षेत्रात किंवा करमणूक क्षेत्रातही आपला व्यवसाय वाढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.. धोरणात्मक विकासक प्रकल्पांसाठी एकमेकांना एकत्रित करण्याचा आणि भागीदारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुरवठादार आणि विक्रेते शोधत आहेत.

या संशोधन अहवालात अनेक आर्थिक, सरकारशी संबंधित, कामगारांशी संबंधित, प्रकल्प पूर्ण करणे आणि ग्राहकांशी संबंधित रणनीती नमूद केल्या आहेत. काही विकासक एक धोरणात्मक पवित्रा घेत एकमेकांच्या सहकार्याने आणि भागिदारी करत प्रकल्प करतांना दिसत आहेत.

तसेच ते बार्टर एग्रिमेंट करू शकतील असे सप्लायर्स आणि व्हेंडर्सना प्राधान्य देत आहेत. या संशोधन अहवालात अनेक आर्थिक, सरकारशी संबंधित, कामगारांशी निगडीत, प्रकल्प पूर्ण करण्याबाबतचे आणि ग्राहकांशी संबंधित रणनीती नमूद करण्यात आल्या आहेत.

क्रेडाइ-एमसीएचआयबद्दल...

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीची (क्रेडाइ-एमसीएचआय) स्थापना १९८२ साली झाली. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील ही प्रमुख आणि मान्यताप्राप्त संघटना आहे. बांधकाम विकास क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना क्रेडाइ-एमसीएचआय एका व्यासपीठावर आणून या उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करते.

मुंबईतील १८०० अग्रगण्य विकासकांच्या सदस्यत्वासह क्रेडाइ-एमसीएचआयने मुंबई महानगर क्षेत्रातही विस्तार केला असून, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-विरार शहर, रायगड आणि नवी मुंबई येथे संघटनेची कार्यालये आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील निवासी व व्यापारी मालमत्तांच्या संघटित विकासकामांपैकी ८० टक्के कामांचे विकासक क्रेडाइ-एमसीएचआयचे सदस्य आहेत.

Similar News