डॉ. पायल आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी योग्य कलमं लावली नाहीत – डॉ. संदेश वाघ

Update: 2019-05-29 21:10 GMT

डॉ. पायल आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात नव्यानं समाविष्ट केलेल्या कलमांनुसार गुन्हाच दाखल केला नसल्याबद्दल महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य-सचिव डॉ. संदेश वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांना त्या कलमांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शिक्षण संस्थांमध्ये विशेष मागासवर्ग कक्ष असलाच पाहिजे, या शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचंही डॉ. वाघ यांनी सांगितलं. डॉ. पायल शिकत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातही हा कक्ष नसल्याचं डॉ. वाघ यांनी सांगत महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केलीय.

https://youtu.be/VDDZ2gYAozQ

Similar News