कुडाच्या झोपडीत भरते शाळा, पाहा प्रगतीशील महाराष्ट्रातील विदारक चित्र

Update: 2020-01-15 10:47 GMT

महाराष्ट्र सरकार शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. तर प्रत्येकाला चांगले शिक्षण देणे. हे सरकारचे कर्तव्य आहे. पण हा खर्च होत असताना काही मुलांना मात्र, त्याचा लाभ मिळताना दिसत नाही. हिंगोली जिल्ह्यात अशी आज शाळा आहे. जी कुडाच्या झोपडीत चालते. 2014 पासून या शाळेला साधी खोली उपलब्ध होऊ शकली नाही.

ऊन असो की वारा असो की पाऊस असो ही शाळा भरते. ती कुडाच्या झोपडीत. पण प्रशासनाला काही पडले नाही. सेनगाव तालुक्यातील मुसाजिनगर मधील शाळेत 17 विद्यार्थी आहेत. पटांगणात उभारलेल्या झोपडीत भरणारी ही शाळा पाहून कुणालाही संताप येईल. मात्र, जिल्हाधिकारी आमदार आणि शिक्षण अधिकारी यांच्या मते ही शाळा चांगली आहे. मात्र, शाळेला एखादी चांगली खोली उपलब्ध करण्याची कुणाचीच मागणी नाही.

या शाळेसंदर्भात आम्ही त्याच्याशी संपर्क साधला तर त्यांची उत्तरं देखील थक्क करणारी आहेत. शिक्षण अधिकारी सोनटक्के यांनी तर मला माहिती नाही. असं उत्तरं दिलं तर आता आम्ही एक महिन्यात बांधू असं सांगितलं. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी रुपेश जय वंशी यांनी तर मला माहित नाही. माहिती मागून घेतो असं सांगितलं. पाहा काय आहे. सर्व प्रकरण...

Full View

Similar News