पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग

Update: 2018-09-08 09:23 GMT

दिवसेंदिवस होणारी इंधन दरवाढीने सध्या सामान्य जनता संतापून गेली आहे. सध्या ही दरवाढ दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे जाणवतेय. या दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रेसकडून देशव्यापी बंद पुकारण्यात येणार आहे.

मुंबईतील आज शनिवारी असलेला एकंदरीत पेट्रोलचा दर ८७ रूपये ७७ पैसे तर डिझेलचा दर ७६ रूपये ९८ पैसे इतका आहे. म्हणजे पेट्रोलचा वाढलेला दर हा ३८ पैसे इतका आहे. यासगळ्यासंदर्भात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल, डिझेल दरवाढ होत असल्याचे कारण सरकार देत आहे. या रोजच्या वाढत्या दरवाढीवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी काँग्रेसकडून १० सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात येणार आहे.

Similar News