ही लढाई सोपी नाही – शरद पवार

Update: 2018-06-20 15:16 GMT

हेगडे यांच्या संविधानाबाबतच्या वक्तव्यावरुन संविधानाची चिंता वाढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ.बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या घटनेबाबत आसुया आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मार्गदर्शक तत्व, दिशा दाखवण्याचे काम केले आहे. गोळवलकर आणि त्यांच्या असंख्य लोकांनी घटनेबाबत एक वेगळा विचार नव्या पिढीसमोर ठेवत आशंका निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांचा घटनेवर विश्वासच नसल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांचे खास अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सामान्य माणसाचा आधार, सामान्यांचे शक्तीकेंद्र, सामान्यांचा संकटमोचक म्हणजे संविधान असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या देशाचे संविधान हे जगात वेगळं आहे म्हणून बाहेरच्या देशांनी स्वागत केले. मात्र ज्या देशात संविधान आहे त्या देशांमध्ये संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला मात्र आपल्या देशात संविधानाला धक्का देण्याचा प्रयत्न झाला तरी शेवटचा सामान्य माणूस पेटून उठतो ही संविधानाची ताकद असल्याचेही शरद पवार म्हणाले.

Similar News