ईशान्य भारत भूकंपाने हादरला

Update: 2018-09-12 08:11 GMT

बांगलादेशमधील रंगपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

ईशान्येकडील राज्यांना तसेच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सकाळी भूकंपाचा धक्का बसला. किशनगंज, कटिहार आणि पूर्णिया या बिहारच्या परिसरात नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि आसामला या भागात धक्के जाणवल्याची माहिती आहे.

https://twitter.com/ANI/status/1039746607137337344

या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी होती. 25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याची अद्याप माहिती नाही.

जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना आज पहाटेच भूकंपाचा धक्का बसला होता. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ४.६ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.

Similar News