कुलभूषण जाधव यांना फाशी नाही आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय

Update: 2019-07-17 13:53 GMT

संपुर्ण देशाचं लक्ष लागलेल्या भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) आज निकालाचे वाचन सुरु आहे. या निकालात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली असुन हा निकाल भारताच्या बाजून लागला असून कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. १५-१च्या फरकाने हा निकाल लागला आहे.

आयसीजेने कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून भारतावर लावण्यात आलेल्या आरोपांना योग्य मानलेले नाही. २ वर्षे आणि दोन महिने आससीजेमध्ये १५ सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. खंडपीठाने निकालात म्हटले आहे की, पाकिस्तानकडून जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सिस देण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा अशी सूचना आयसीजेने केली आहे. या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सिस देण्यात यावा असेही कोर्टाने म्हटले आहे.

Similar News