रेल्वे स्थानकांवरील वॉटर व्हेंडिंग मशीन बंद होण्याच्या स्थितीत, रेल्वे प्रवाशांचे हाल

Update: 2019-12-02 13:44 GMT

मुंबईतील अनेक लोक ऑफिसमध्ये जाण्यासाठी किंवा खाजगी कामांसाठी रेल्वेने प्रवास करत असतात. काही प्रवासी पाणी पिण्यासाठी वॉटर व्हेंडिंग मशीनचा(water vending machine) वापर करत असतात. अतिशय स्वस्त दरात थंड पाणी मिळत असल्यामुळे रेल्वे प्रवासी पूर्णपणे या वॉटर मशीनचा वापर करत असतात.

परंतू आता हेच वॉटर व्हेंडिंग मशीन बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चेहऱ्यांवर निराशा पाहायला मिळाली. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे वॉटर मशीनवर काम करणारे कर्मचाऱ्यांना मासिक वेतन गेले चार ते सहा महिन्यापासून दिले नाही, त्यामुळे मासिक वेतन नसल्यामुळे काही रेल्वे स्थानकांवर वॉटर मशीन बंद पडल्याच्या स्थितीत आढळून आले आहेत.

याच कर्मचाऱ्यांना वेतन मिळेपर्यंत पाणी विकून पैसे घ्या. अशी मुभा देखील कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना दिले आहे, या तत्वावर काही कर्मचारी वॉटर मशीन वर काम देखील करत आहेत, पण पाहिजे तसा फायदा या कर्मचाऱ्यांना होत नाही. काही कर्मचाऱ्यांनी आपलं वेतन मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव देखील घेतली आहे. या संदर्भात वॉटर मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी आम्ही बातचित केली.

Full View

Similar News