कलम ३७७ बाबत सर्वोच्च न्यायालयाने मांडले हे महत्त्वाचे मुद्दे... 

Update: 2018-09-06 08:35 GMT

कलम ३७७ बाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक बाबींचा उल्लेख केला व १० महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

हे महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

१. प्रत्येकाला स्वत:च्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे.

२. जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे.

३. लोकांनी आपली मानसिकता बदलायला हवी.

४. सहमतीने प्रौंढासोबत एकांतात समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही.

५. देशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत.

६. जुन्या विचारसरणीला बाजूला सारत, देशात सर्वांना सन्मानाने जगता

आलं पाहिजे.

७. समाजाने पूर्वग्रहदूषित विचारधारेपासून मुक्त व्हायला हवं.

८. प्रत्येकाने आकाशात इंद्रधनुष्य शोधायला हवा.

९. प्रौंढासोबत सहमतीशिवाय समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा असणार आहे.

१०. मुलं आणि प्राण्यांशी अनैसर्गिक संबंध गुन्ह्याच्या कक्षेत असणार आहे.

Similar News