एमबीपीटी आणि झेब्रो सीआयएसएफच्या टी -20 सेमीफाइनलमध्ये धडक

Update: 2018-11-28 09:25 GMT

आरसीएफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळवलेल्या सीआयएसएफ गोल्डन ज्युबली टी -20 क्रिकेट टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये २७/११/२०१८ रोजी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमबीपीटी) आणि झेब्रो फाऊंडेशनने प्रवेश केला. मुंबई पोर्ट ट्रस्टने महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या संघाला तीन धावांनी पराभूत केले तर झेब्रो फाऊंडेशनने माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लब (एमडीएससी) वर २९ धावांनी विजय मिळविला.

CISF गोल्डन ज्युबली क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटनाला माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस. नाईक, सतीश खंदारे, आयजी, सीआयएसएफ, सीआयएसएफच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सीआयएसएफच्या मुंबई बेसिस युनिट कमांडर्सच्या उपस्थितीत झाले. 116 कसोटीतील अनुभवी दिलीप वेंगसरकर, खेळाडूंना संबोधित करताना म्हणाले, "खेळाचा आनंद घ्या आणि योग्य रीतीने खेळ खेळा!"

https://youtu.be/JXGOL7MlQ2w

 

Similar News