पर्यावरणप्रेमी म्हणतात ‘मॅक्स महाराष्ट्र’चा सिंहाचा वाटा

Update: 2019-12-01 14:52 GMT

आरेतील (Aarey) मेट्रो कारशेड (MetroCarShed) ३ साठी वृक्षतोङ करण्यात आली. याचा निषेध करत नव्या सरकारने कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे आदिवासी बांधव आणि पर्यावरणप्रेमींमध्ये आंनदाचं वातावरण आहे. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या लढ्याला यश मिळाल्यामुळे सर्वजण समाधन व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा...

आरे’ कारशेडच्या कामाला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

आरेतील वृक्षतोडीची स्थगिती कायम…

आरे : तरुणाईचा जाहीरानामा…

मेट्रोच्या कारशेडसाठी २,७०० वृक्षतोडीच्या विरोधात अनेक पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले होते. शेकडो आंदोलकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. सोशल मीडियावरही SAVE AAREY अशी मोहीमही चालवण्यात आली होती.

आरेमधील वृक्षतोडीचं प्रकरण ‘मॅक्स महाराष्ट्र’ने लावून धरलं होतं. आरेतील प्रत्येक घडामोड ‘मॅक्स महाराष्ट्र’ने दाखवली. त्यामुळे मेट्रो कारशेडचं काम थांबण्यात आल्यानंतर यात ‘मॅक्स महाराष्ट्र’चा सिंहाचा वाटा आहे अशा प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी दिल्या.

Full View

Similar News