अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मानगुटीवर! खरीप बरोबरच रब्बी ही पाण्यात...

Update: 2020-03-18 11:58 GMT

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला, शेतकऱ्यांना आशा होती ती आता रब्बी हंगामाकडून. मात्र, ही आशा देखील आता फोल ठरताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय.राज्यातील काही भागात वादळी वारा तसंच गारांच्या पाऊसामूळं शेकडो हेक्टर वरील रब्बी पीक जमीनदोस्त झालंय.खानदेश सह विदर्भ, मराठवाडयातील काही भागात झालेल्या अवकाळी पाऊसामुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या गहू, हरभरा, मका, या पिकांबरोबरच केळी, पपई या फळ पिकांचंही कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय.

जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, मुक्ताईनगर, बोदवड, चोपडा, जामनेर , रावेर या तालुक्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसलाय. वादळी वाऱ्या बरोबरच गारपीट झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. कापणीवर आलेला गहू आणि हरबरा भुईसपाट झाला आहे. केळी आणि पपई जमीनदोस्त झालीय. अतिवृष्टी मूळ खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, कडधान्य, सोयाबीन , ह्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं बियानाचे पैसे देखील मिळाले नव्हते. शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला होता.

यंदा पाऊस अति झाल्याने खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र, हे नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी गहू, हरबरा, तसंच मक्याची लागवड केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे तेही हातातून निघून गेलं आहे. यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडला असून सरकारने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/232125041312152/

 

Similar News