#शेतकरी_वाचवा अवकाळी पावसानं भिजलेली दिवाळी

Update: 2019-10-30 10:59 GMT

मागच्या काही दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा ५ तालुक्यांना फटका बसला आहे. महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरू असल्यानं शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

एकीकडे सर्वजण दिवाळी साजरी करत असतांना दुसरीकडं पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी शेतात साजरी करण्याची वेळ आणली आहे. परतीच्या पावसाने दुष्काळाचे सावट दूर झाले असले तरी खरिपातील काढणीस आलेला कापूस, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गदाना शिवारातील अवकाळी पावसाने झालेल्या मका, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान याविषयीचा

'मॅक्स महाराष्ट्र'चे सिटीझन जर्नालिस्ट अरुण आधाने यांचा हा रिपोर्ट

Full View

Similar News