मान्सूनची आठवडाभर प्रतीक्षा

Update: 2019-06-17 03:25 GMT

महाराष्ट्रात आठवड्याभरात पाऊस येणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. “वायू’ चक्रीवादळ संथ झाल्यानंतर मान्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले आहेत. कर्नाटकापर्यत दाखल झालेल्या मान्सूनच्या आगामी वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज आहे.

“वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला उत्तरेकडील प्रवास सुरू करत शुक्रवारी मान्सून दक्षिण कर्नाटकाच्या म्हैसूर मंगळुरूपर्यंत पोहचला आहे. त्याच्या आगामी वाटचालीसाठी सध्या योग्य स्थिती असल्याने येत्या चोवीस तासांत कर्नाटकाच्या काही भागांत दाखल होईल. त्याचबरोबर तामिळनाडूमधील काही भागांतसुद्धा मान्सून दाखल होऊ शकतो. महाराष्ट्रात मान्सून आठवड्याच्या शेवटच्या टप्यात दाखल होण्याची शक्‍यता आहे. सध्या कोकणात चांगला पाऊस पडत आहे.

Similar News