कुठे गेले आ. श्रीमंत पाटील?

Update: 2019-07-20 07:09 GMT

कर्नाटक येथील बेपत्ता झालेले काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील हे सध्या मुंबईत आहेत. हृदयाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत असं सांगण्यात आलं होतं. याची माहिती मिळाल्यावर काल (१९ जुलै) रोजी उशिरा आ. यशोमती ठाकूर त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. तर डॉक्टरांकडूनही उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली.

ज्या रुग्णालयात उपचारासाठी हृदयरोग तज्ज्ञ नाहीत, हृदयरोग कक्ष नाही अशा रुग्णालयात एका आमदारावर उपचार कसे होतात? आणि रुग्णालयात शेकडो पोलिसांनाच पहारा कशासाठी आहे? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. पोलीस, रुग्णालय प्रशासन हे सरकारचे 'अर्थपूर्ण लाभार्थी' आहेत म्हणूनच ही मंडळी घोडेबाजार करत आहेत. आणि आ. पाटील यांना उपचाराच्या नावाखाली डांबून ठेवलं असल्याचा आरोप आ. ठाकूर यांनी केलाय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/3095786110446734/?t=7

https://youtu.be/iMon3wq2B1Q

Similar News