मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी बंद, पाच हजार रुग्णांचे प्राण धोक्यात

Update: 2019-11-21 14:51 GMT

राज्यात विधानसभेचा 24 नोव्हेंबरला निकाल लागला. मात्र, अद्यापपर्य़ंत कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापन केली नाही. त्यामुळे राज्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या शिफारशी नुसार राष्ट्रपती राजवट (President's rule) लावण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

राज्यात राष्ट्रपती राजवट असल्यानं मंत्रालयात निर्णय घेतले जात नाहीत. त्यातच मुख्यमंत्री (Chief ministe) साहय्यता निधीतून सर्व सामान्य लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवल्या जातात. मात्र, आता सरकार अस्तित्वात नसल्यानं अनेक लोकांना या निधी अंतर्गत मिळणारी मदत मिळत नाही.

त्यातच राज्यात झालेल्या परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारचं अस्तित्वात नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्ष प्रयत्न करत असून सर्व पक्ष आमचं सरकार येईल असं म्हणत आहे. मात्र, राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना राजकीय पक्ष स्वत:ला सत्ता कशी मिळेल. फोडा फोडी कशी करता येईल. याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्थ आहेत.

या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे प्रतिनिधी विशाल धनगर आणि प्रसन्नजित जाधव यांचा थेट मंत्रालयातून विशेष रिपोर्ट

Full View

Similar News