पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

Update: 2019-06-17 03:02 GMT

राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आल्याने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नव्या मंत्र्यांची दमछाक होताना पाहायला मिळू शकते. शेतकरी, बेरोजगारी, दुष्काळ अशा विविध मुद्द्यांवरुन आक्रमक भूमिका घेत विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पावसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल. तसेच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा होईल असं सांगितले. तसेच अधिवेशनात 13 नवीन विधेयक आणि विधान सभेतील प्रलंबित 12, विधान परिषदेतील प्रलंबित 3 अशी एकूण 28 विधेयक चर्चेला येणार आहेत अशी माहिती दिली. आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याची घोषणा, मंत्र्यांचा परिचय, अध्यादेश पटलावर मांडणे आणि शोकप्रस्ताव असं दिवसभराच्या कामाकाजाचं स्वरुप राहणार आहे.

Similar News