एम.जे. अकबर राजीनामा द्या - शिवसेनेने साधला भाजपवर निशाणा

Update: 2018-10-11 11:39 GMT

एम.जे. अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर दरू लागली असताना शिवसेनेने सुद्धा विरोधीपक्षांच्या सुरात सूर मिसळला आहे.भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेने परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांचा राजीनामा मागितलाय. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी असा सवाल करून अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले असताना अजून ते मंत्रीपदावर कसे आहेत असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर कायंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. 'बेटी बचाव, बेटी पढाव' ही घोषणा फक्त बोलण्यासाठी आहे का असा आरोपही त्यांनी केला. #MeToo या मोहिमेत अनेक पत्रकारांवरही आरोप झाले असून त्यामुळं अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते. बॉलिवूड, पत्रकारीता आणि आता राजकरण्यांवरही आरोप होऊ लागल्याने खळबळ उडालीय. वर्षभरापूर्वी अमेरिकेत MeToo ही चळवळ सुरू झाली होती.

Similar News