थाळी एक तोंड अनेक, सरकार शिवभोजन थाळींची संख्या वाढवणार का?

Update: 2020-04-11 11:12 GMT

राज्यात गोरगरिबांचं पोट भरावं म्हणून महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘शिवभोजन’ योजना सुरु केली. आता लॉकडाऊन च्या काळात ही योजना गोरगरिबांसाठी वरदान ठरली आहे. 5 रुपयात जेवन मिळतं. मात्र, शिवभोजन योजनेतील थाळ्य़ांची संख्या कमी आणि खाणाऱ्य़ांची तोंड अधिक झाल्यानं अनेक लोकांना अन्न मिळत नसल्यानं रांगेत उभं राहून परत जावं लागत आहे.

परभणी जिल्ह्य़ामध्ये नव्यानं सुरु झालल्या शिवभोजन केंद्रावर फक्त 75 च थाळी दिल्या जातात. 75 थाळी नंतर जेवन मिळत नाही. अशा परिस्थितीत सरकारनं थाळींची संख्या लॉकडाऊन च्या काळापर्यंत तरी वाढवावी. अशी विनंती परभणी करांनी केली आहे.

Full View

Similar News