महिलांनो अन्याय अत्याचार झाल्यास कोणत्या कायद्याचा आधार घ्याल?

Update: 2019-12-12 12:49 GMT

अनेक महिला घरची इज्जत म्हणून कधीही होणारे अत्याचार सहन करत असतात. कधी कधी कधी या वेदना त्यांचा जीव घेऊन जातात. तरीही त्या या असह्य वेदना सहन करतात. मुलींना जाता येता नको ते स्पर्श केले जातात. तरीही त्या सहन करत असतात.

मात्र, महिलांनो जर तुम्हाला असा कोणी त्रास देत असेल तर हे कायदे नक्की समजून घ्या. कौटुंबिक हिंसाचार व प्रतिबंधक कायदे ज्येष्ठ वकील नितिन सातपुते यांच्यासोबत यावर आमचे प्रतिनिधी प्रियंका धारेवाल यांनी केलेली विशेष बातचित

  • कलम ३५४ (अ,ब,क,ङ) महिलांना लज्जा उत्पन्न करणारे कृत्य किंवा शब्द वापरल्यास गुन्हा होऊ शकतो . यात शिक्षा १ वर्ष ते ५ वर्ष होऊ शकते.
  • कलम ३७६ अत्याचार (बलात्कार) इच्छेविरुदध शारीरिक संबंध ठेवले. तर पतीवर सुद्धा गुन्हा नोंदवता येतो. अदखलपाञ गून्हा आहे.३ वर्ष शिक्षा होऊ शकते.
  • कलम ३७६(क) तुरुंग ,हाॕस्पीटल ,आश्रम ,संस्था मध्ये अत्याचार झाल्यास ५ ते १० वर्ष शिक्षा
  • कलम ३७६ (ङ -अ) सामुदायिक अत्याचार शिक्षा मृत्यू, आजीवन कारावास

पोस्को - अल्पवयीन मुलांना (स्त्री -पुरूष) लैंगिक स्पर्श केला. तर पोस्को लागू होतो. तात्काळ अटक केली जाते. लहान मुलांची साक्ष ग्राह्य धरली जाते. जमीन मिळत नाही. मृत्यूदंङाची शिक्षा ठोठावली जाते.

Full View

Similar News