थोडेच दिवस उरले आहेत, सत्तेची मस्ती दाखवू नका - पवारांचा इशारा

Update: 2018-10-01 16:42 GMT

६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे? असा सवाल उपस्थित करीत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही तर त्याची सर्वपक्षीय, संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी आज बीड येथे केली. तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सत्तेची मस्ती दाखवू नका असा इशाराही त्यांनी सरकारसह बीड जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाला दिला.

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील बागलाने मैदानावर आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. बीडच्या इतिहासात प्रथमच इतकी मोठी आणि ऐतिहासिक अशी ही सभा भर उन्हात संपन्न झाली. देशाचे पंतप्रधान मन की बात सांगतात, जन की बात मात्र सांगत नाहीत. शेतकरी, अल्पसंख्यांक, तरुणांची बात मात्र एैकून घेत नाहीत अशा शब्दांत मोदींच्या मन की बातची त्यांनी खिल्ली उडविली. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाचे काय झाले ? असा प्रश्‍न विचारतानाच या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही अशा शब्दांत टोला लगावताना या सरकारला हबाडा दाखविल्याशिवाय आता गत्यंतर नसल्याचे ते म्हणाले.

Similar News