मोदी 'चौकीदार' तर हार्दिक पटेल ‘बेरोजगार’

Update: 2019-03-19 04:59 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून 'मैं भी चौकीदार' ही मोहिम काढली. त्याला भाजपच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर अकांउटचे नाव बदलून चौकीदार ही केलं. त्यामुळे सोशल मीडियावर ही मोहिम बऱ्यापैकी यशस्वी झाली, मात्र, गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते आणि नुकतेच काँग्रेसमध्ये सामील झालेले हार्दिक पटेल यांनी 'चौकीदार' शब्दाला टक्कर देत ट्विटरवर आपल्या नावापुढे 'बेरोजगार' असं लिहिलं आहे.

त्यामुळे ट्विटरवर हार्दिक पटेल यांचं नाव आता 'बेरोजगार' हार्दिक पटेल असं झालं आहे. हार्दिक यांच्या या मोहिमेला ट्विटरवर चांगला प्रतिसाद मिलण्याची शक्यता आहे. या मोहिमेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु असून भाजप या मोहिमेला काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं आहे.

Similar News