सागरेश्वर अभयारण्यात दारुपार्ट्यांना अभय

Update: 2020-02-18 14:43 GMT

देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य असलेला सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य सध्या गैरप्रकाराच्या बातम्यांमुळे वादात सापडले आबे. अभयारण्यात सुरू असलेल्या अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असतानाच या अभयारण्यात बिनधास्तपणे दारू पार्ट्या होत असल्याचे समोर आले आहे. अभयारण्यात आलेल्या काही जागरुक पर्यटकांना आत फिरत असताना दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटं सापडली आहेत.

अभयारण्यात दारू पार्ट्या नेमके कोण करतंय ? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. बाहेरून येणारे पर्यटक करतात की अभयारण्यात कामाला असलेले कर्मचारी करतात ? असा सवालही विचारला जातोय. अधिकाऱ्यांना याबाबत मॅक्स महाराष्ट्रनं विचारलं असता त्यांनी नेमहमीप्रमाणे सरकारी उत्तरं देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

Similar News