कान्हेरी बुद्ध लेणींतील अवैध चित्रीकरण नागरिकांच्या सजकतेने केले बंद...

Update: 2019-05-04 08:15 GMT

काल सकाळी दि. 3 मे रोजी कान्हेरी लेणींवर ABCPR या लेणी संवर्धक टीमचे काही सदस्य नेहमी प्रमाणे अभ्यासाला गेले असता, त्यांना तेथे लेणीं क्र 3 समोर फुलांचा पेंडाल व नंदीची मूर्ती ठेवलेली दिसली. त्याच बरोबर तेथे काही bouncers होते जे लोकांना लेणींमध्ये जाण्यास मज्जाव करत होते. विचारणा केल्यानंतर कळले की तेथे एका तेलगू सिनेमाचे चित्रीकरण होणार होते. या टीम ने लगेच काही फोटो काढून लेणी अभ्यासक व प्राचीन भाषा व लिपी जाणकार अतुल भोसेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सर्व प्रकारची माहिती घेतली व लगेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई सर्कल चे अधीक्षक डॉ. बिपीन चंद्र यांच्याशी संपर्क केला.

सदर चित्रिकरणाची जरी परवानगी मिळवली असली तरी अनेक नियमबाह्य गोष्टी येथे करण्यात आल्या होत्या - चित्रीकरणात ड्रोन चा वापर, bouncers चे लोकांना मज्जाव, फुलांची सजावट व मांडव. चीड आणणारी घटना म्हणजे प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये नंदीची मूर्ती ठेऊन कुठले चित्रीकरण चालले होते. तेथील स्थानिक कर्मचारी हे सगळे मुकाट्याने का सहन करत होते?

भोसेकर यांनी या सगळ्या गोष्टींचा जाब विचारून तात्काळ हे चित्रीकरण थांबवावे आणि या सर्व घटनेची तात्काळ दाखल घ्यावी व संबंधितांवर कारवाई करावी असे आवाहन केले.

परिस्थिचे गांभीर्य ओळखून अधीक्षकांनी लगेच चित्रीकरण थांबवले, तसेच चित्रिकरणाची रु. 50,000/- अनामत रक्कम ही जप्त करण्यात आली आणि या प्रोड्युसरचे नाव काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन भोसेकर यांना दिले.

मात्र मूळ प्रश्न असा आहे की जर ही सर्व प्राचीन स्मारके संरक्षित असतील तर कोणालाही चित्रिकरणाची परवानगी का द्यावी? वास्तूंचे पावित्र्याची जपणूक करण्यात पुरातत्त्व विभाग कमी पडतोय का?

अतुल भोसेकर यांनी आता भारतीय पुरातत्त्व विभागाला कळविले आहे की सर्व बौद्ध लेणींवर अभ्यास व्यतिरुक्त कोणत्याही चित्रीकरणाला परवानगी नाकारण्यात यावी. तसेच प्रत्येक लेणींच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात यावी की, या लेणींमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घ्यावी.

Similar News