अगर मेरा नाम कन्हैया अंबानी होता तो… असं का म्हणतो कन्हैया कुमार

Update: 2019-01-17 05:22 GMT

अगर मेरा नाम कन्हैया कुमार ना होता, कन्हैय्या अंबानी होता तो.. तो पुलिस मेरे पीछे-पीछे घूमती.. असं म्हणणं आहे विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारचं. जेएनयू मध्ये शिकत असताना कन्हैय्या कुमार वर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र आता ऐेन निवडणूकांच्या आधी कन्हैय्या वर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. कन्हैय्या कुमारचं म्हणणं आहे की तो गरीब परिवारातला आहे म्हणून पोलीस त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू पाहतायत.जर माझं नाव कन्हैय्या अंबानी असतं तर पोलिसांनी चार्जशीट दाखल न करता माझ्या मागे चकरा लावल्या असत्या. सत्य हिंदी या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कन्हैय्या ने आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगीतलं आहे.

१४ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी कन्हैय्या कुमार आणि इतर विद्यार्थी नेत्यांच्या विरोधात मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट समोर चार्जशीट दाखल केली आहे. २०१६ मध्ये जेएनयू मध्ये देश के टुकडे होंगे.. अशा आशयाच्या घोषणा दिल्याचा कन्हैय्या कुमार वर आरोप आहे. कन्हैय्याला या प्रकरणी अटक ही करण्यात आली होती. सध्या कन्हैय्या जामीनावर बाहेर आहे.

केंद्र सरकार जेएनयू ला बदनाम करू पाहतंय, केंद्र सरकारच्या विरोधात जे जे लोक उभे राहतात त्यांना अशा पद्धतीने अडकवलं जातंय असा आरोप कन्हैय्या कुमार ने लावला आहे. आरएसएसच्या पाञ्चजन्य आणि ऑग्रजनायझर या मुखपत्रांनी जेएनयूच्या विरोधात रिपोर्ट छापून आले होते. यावरून केंद्राच्या कटाची माहिती मळते असं कन्हैय्याचं म्हणणं आहे.

कन्हैय्या ने सत्यहिंदी शी बोलताना सांगीतलंय की देशविरोधी घोषणांचा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. एका चॅनेलने मुद्दामहून हा व्हिडीयो एडीट करून प्रसारित केला होता. दिल्ली सरकारने मॅजिस्ट्रेटच्या माध्यमातून केलेल्या चौकशीत व्हिडीयो मध्ये छेडछाड झाल्याचं समोर आलेलं आहे. आता तीन वर्षांनंतर चार्जशीट दाखल केली जात आहे. देशातील इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर इतक्या उशीरा चार्जशीट दाखल करण्यामागचे हेतू आता लपून राहिलेले नाहीत. हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालवलं गेलं पाहिजे अशी मागणी ही कन्हैय्या कुमार ने केलीय.

Full View (शैलेश, सौजन्य सत्यहिंदी.कॉम)

Similar News