Fact Check : शहिदांना श्रद्धांजली वाहताना खरंच राहुल गांधींनी मोबाईल वापरला का?

Update: 2019-02-17 05:21 GMT

सध्या सोशल मीडियावर खोट्या बातम्या, व्हिडीओ, फोटो जास्त प्रसारीत केले जात आहेत. यामध्ये जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांचा समावेश आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय सभेत श्रद्धांजली वाहत असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोनचा वापर केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष बाब म्हणजे अभिनेते परेश रावल यांनी देखील हा फोटो ट्विट केला असून या फोटोवर ‘राहुल गांधी शहीदो को सही से सम्मान भी नही दे सकते’ असं लिहिलं आहे.

तर भारत पॉझिटिव्ह या फेसबुक पेजवर देखील एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून या पोस्ट मध्ये राहुल गांधी आणि मोदींची तुलना केली आहे. ‘राहुल गाँधी की शर्मनाक हरकत’ या आशयाची ही पोस्ट आहे.

Full View

राहुल गांधींनी फोन वापरला?

दरम्यान यानंतर आम्ही विविध वृत्तवाहिन्यांवर यासंदर्भातील व्हिडीओ चेक केले असता राहुल गांधी यांनी फोन वापरल्याचे समोर आले मात्र, वरील पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे राहुल यांनी हा फोन श्रध्दांजली देत असताना वापरला नसल्याचं सष्ट झालं आहे.

या संदर्भात परेश रावल यांना सोशल मीडियावर प्रश्न देखील विचारण्यात आले आहे.

दरम्यान या संदर्भात विविध वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहिले असता ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीवर आम्हाला या कार्यक्रमाचे पूर्ण वृत्त मिळाले.राहुल गांधी यांना फोन येतो. त्यानंतर ते खिसे चाचपतात. चाचपल्यानंतर ते फोनवर काहीतरी टाईप करतात. तोपर्यंत पंतप्रधानांना येण्याची लगबग सुरु होते आणि कॅमेरा मुव्ह होतो. त्यानंतर एका ठिकाणी एक लष्करी अधिकारी राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना दिसत आहेत. मात्र, राहुल गांधी यांचे मात्र, त्यांच्याकडे पुरेसे लक्ष नाही. मात्र, ते लष्करी अधिकारी राहुल यांच्याशी असलेलं संभाषण सुरुच ठेवतात. दरम्यान यावेळी कोणीच बोलत नसताना हे लष्करी अधिकारी बोलत असताना राहुल थोडेसे असहज होताना दिसतात.

या व्हिडीओमध्ये ३१ मिनिट आणि ४० सेकंदाला राहुल गांधी सर्व पक्षीय नेत्यांसोबत श्रद्धांजली देत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर बराच वेळ ते या ठिकाणी उभं आहेत.

या व्हिडीओमध्ये श्रद्धांजली वाहत असताना राहुल यांनी मोबाईल वापरल्याचं दिसून येत नाही.

Full Viewसौजन्य - टाईम्स नाऊ

Similar News